Drishyam 2 Box Office 
Latest

Drishyam 2 Box Office : ‘दृश्यम 2’ची ‘अवतार-२’ला जोरदार टक्कर, ३७ व्या दिवशीही केली दमदार कमाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : दृश्यम २ हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली. या चित्रपटाने ३७ व्या दिवशी करोडोंची कमाई केली आहे. पहिल्या अठवड्यापासून ते आतापर्यंत म्हणजे सहाव्या
आठवड्यापर्यंत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच आलेल्या सर्कस, अवतार-२ या चित्रपटालाही दृश्यम – २ जोरदार टक्कर देत असलेले चित्र पहायला मिळत आहे. (Drishyam 2 Box Office)

Drishyam 2 Box Office :  कमाई लवकरच पोहोचेल २५० कोटींच्या घरात

अजय देवगणचा 'दृश्यम २' हा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २३६ कोटींची एकूण कमाई केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट २५० कोटींचा टप्पा पार करेल, असे मानले जात आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५.३८ कोटी रुपये इतकी कमाई केली होती. तसेच पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १०४.६६ कोटी रुपयांचा गल्‍ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यात १६३.४८ रुपये, तिसर्‍या आठवड्यात १९६.३० कोटी तर चौथ्या आठवड्यात २१५.७० कोटी रुपये आणि पाचव्या आठवड्यात २२४.६८ कोटी रुपयांपर्यंत कलेक्शन झाले आहे.आताच्या सहाव्या आठवड्यातही चित्रपटाची दमदार कमाई सुरूच आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT