Urfi Javed : ऊर्फीचा उफ कास्टिंग काऊच!चा खुलासा; म्हणाली बोल्ड सीन्स… | पुढारी

Urfi Javed : ऊर्फीचा उफ कास्टिंग काऊच!चा खुलासा; म्हणाली बोल्ड सीन्स...

पुढारी ऑनलाईन : बऱ्याच कलाकारांना करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. आतापर्यंत अनेकांनी कास्टिंग काऊचच्या अनुभवावर खुलेआम भाष्य केले आहे. आता अभिनेत्री ऊर्फी जावेदनेही ( Urfi Javed ) याबाबत भाष्य केले आहे.

ऊर्फी ( Urfi Javed ) नेहमीच तिच्या कपड्यांच्या स्टाईलवरून चर्चेत असते. मनोरंजनसृष्टीत पदार्पण करताना तिला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला होता, असा धक्कादायक खुलासा तिने केला.

एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मी घरातून पळून मुंबईला आले. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी कामाच्या शोधात होते. एका निर्मात्याने मला वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. मी त्यांना नकार दिला. तरीही ते जबरदस्ती करतच राहिले. मी जर बोल्ड सीन्स दिले नाहीत तर ते मला तुरुंगात टाकतील, अशी धमकीही त्यांनी मला दिली. परंतु मी स्वतःला नशीबवान समजते की, मी यातून सुखरूप बाहेर पडू शकले. ‘

Back to top button