Latest

सूर्यापेक्षाही उष्ण आठ नव्या तार्‍यांचा शोध

backup backup

नवी दिल्ली : ब्रह्मांडात आपल्या पृथ्वीपासून अनेक प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेले तारे आपल्याला अनोखी, पण उपयुक्त माहिती देत असतात. यासाठीच तमाम खगोलशास्त्रज्ञ सूर्यमालेबाहेर असलेल्या अवकाशीय पिंडांचा सखोल अभ्यास करतात. अशाच एका संशोधनादरम्यान भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी अत्यंत दुर्लभ व कमी प्रमाणात दिसणार्‍या आठ नव्या तार्‍यांचा शोध लावला.

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले हे तारे 'मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर' (एमआरपी) श्रेणीतील असल्याचे म्हटले जात आहे. पुणेस्थित राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील पथकाने 'जॉयंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप'च्या मदतीने हा शोध लावला आहे

संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना असे आढळले की, हे तारे आपल्या सूर्यापेक्षाही जास्त उष्ण असून, त्यांचे 'मॅग्नेटिक फिल्ड' प्रचंड शक्तिशाली आहे. याशिवाय तेथील सौरवाराही अधिक ताकदवान आहे. एनसीआरएच्या माहितीनुसार, यापूर्वीही अशाच प्रकारच्या तीन तार्‍यांचा शोध लावण्यात आला आहे

. आतापर्यंत ज्ञात असलेल्या 15 एमआरपीमधील 11 तार्‍यांचा शोध हा जीएआरटीच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. यातील आठ तारे 2021 मध्ये शोधण्यात आले आहेत.

एमआरपी म्हणजे काय?

मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर (एमआरपी) हे सूर्यापेक्षाही उष्ण तारे असतात. या तार्‍यांची मॅग्नेटिक फिल्ड आणि वारे प्रचंड शक्तिशाली असतात. यामुळेच ते अवकाशात एखाद्या लाईटहाऊससारखे दिसतात. याशिवाय ते अत्यंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT