file photo 
Latest

आधी स्वत:च सरण रचले, मग विधिवत पूजा आणि नंतर सरण पेटवून शेतकऱ्याची आत्महत्या

सोनाली जाधव

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरावर रिघ लागली असताना; नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील एका वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. चितेत उडी घेण्यापूर्वी वृद्ध शेतकऱ्याने सरणाची मृत्यूपूर्वी विधिवत पूजा केल्याचे घटनास्थळी दिसून आले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्माराम मोतीराम ठवकर (वय ८०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते.

शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले

आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे होते. २००६ मध्ये त्यांच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, हे दुखणे अजूनही सुरूच होते. माहितीनुसार, मृतकाच्या मुलाची गॅस गोडावूनलगत शेती आहे. मृतकाने मृत्यूच्या रात्री गावात मंडईनिमित्त आयोजित नाटकाचा रात्रभर आनंद घेतला. पहाटे गावातील मंदिरात पूजा-अर्चा करून ते शेताकडे आले. शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले. त्यावर तणस पसरवले. विड्याच्या पानावर दिवे लावून सरणाची पूजा केली. त्यानंतर सरण पेटवून चितेत उडी घेतली, असा संशय आहे. त्यांचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळाल्याचे दिसून आले.

घटनेनंतर मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आनंद कविराज यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तत्काळ पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा दरम्यान, सरणावर अर्धवट मृतदेह व शेजारी पेटलेला दिवा आढळला. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व शिपाई सुरपाम करीत आहे़. या घटनेनंतर कुटुंबीयांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

हेही वाचलतं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT