Latest

डॉ. मनमोहन सिंगांनी राज्यसभेतील जागा बदलली ! ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत सभागृहाच्या पहिल्या रांगेत बसायचे ते आता शेवटच्या रांगेत बसत आहेत. आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांना सदनाच्या पहिल्या रांगेपर्यंत चालत जाताना त्रास होत होता, म्हणून त्यांनी सीट बदलून घेतली आहे.

डॉ.मनमोहन सिंग यांनी गेल्या अधिवेशनातही त्यांची जागा बदलण्याची मागणी केली होती. पण तेव्हा जागा बदलता आली नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. पहिल्या रांगेपर्यंत चालत जाताना डॉ. सिंग यांना त्रास होत होता. सदनाच्या शेवटच्‍या रांगेजवळ प्रवेशद्वार आहे. तिथे व्‍हीलचेअर सहज आणता आणि नेता येते.

डॉ. सिंग मागच्या रांगेत गेल्यानंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंग आता पहिल्या रांगेत बसलेले दिसतात. तसेच पुढील रांगेत विरोधी पक्षातून जेडीएस नेते एचडी देवगौडा, आम आदमी पार्टी (आप) नेते संजय सिंह, आरजेडीचे प्रेमचंद गुप्ता, तृणमूल काँग्रेसचे (TMC) डेरेक ओ ब्रायन, द्रमुकचे तिरुची शिवा आणि बीआरएसचे के. केशव राव बसलेले दिसतात.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT