दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक | पुढारी

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जाहिरात संस्था चालविणाऱ्या राजेश जोशीला सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. घोटाळ्यातून मिळालेला पैसा गोवा विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी वळविल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.

घोटाळ्यातून मिळालेल्या पैशापैकी जवळपास शंभर कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने वापरल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. ईडीने या प्रकरणात दोन वेगवेगळे दोषारोपपत्र दाखल केली आहेत. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तपास संस्थांनी आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेत, ईडीने या प्रकरणी हवालाचे गुन्हे दाखल केले होते. सीबीआय तसेच ईडीच्या एफआयआरमध्ये आप नेते व उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांच्‍या नावाचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button