

पुढारी ऑनलाइन डेस्क : Adani Group : फ्रान्सची कंपनी टोटल एनर्जीने अदानींसोबत गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी भागीदारी वाढवण्यासाठी करार केला होता. मात्र, त्यावर अद्याप स्वाक्षरी केलेले नाही, असे फ्रेंच तेल क्षेत्रातील प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी बुधवारी सांगितले.
Adani Group : पॅट्रिक पोयाने पत्रकारांना सांगितले की कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने आर्थिक अनियमिततेच्या आरोपांना प्रतिसाद म्हणून समूहाने सुरू केलेल्या ऑडिटच्या निकालाची वाट पाहत आहे. त्यामुळे नवीन हायड्रोजन उपक्रमाचा संदर्भ देत पोयाने म्हणाले, कशावरी स्वाक्षरी झाली नसल्याने ते अस्तित्वात नाही. पोयने पुढे म्हणाले, सध्या अदानींकडे हाताळण्यासाठी इतर गोष्टी आहेत, त्यामुळे ऑडिट पुढे जात असताना सध्या गोष्टींना विराम देणे हेच चांगले आहे.
Adani Group : यावेळी ते म्हणाले, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीमधील टोटल एनर्जीचे स्टेक फ्रेंच कंपनीने विकत घेतले त्यापेक्षा जास्त किमतीचे आहे."आम्ही गुंतवलेल्या गुंतवणुकीपेक्षा अदानी ग्रीनची किंमत अजूनही दुप्पट आहे, अदानी गॅसची किंमत अजूनही आठपट जास्त आहे. आमचा हिशेब योग्य आहे.
हे ही वाचा :