Latest

डॉ. धर्मकारे हत्याकांड प्रकरण : मृत भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या

अनुराधा कोरवी

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. हनुमंत धर्मकारे ( डॉ. धर्मकारे हत्याकांड प्रकरण) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येच्यावेळी मुख्य मारेकरी एैफाज शेख अब्रार याने मृत भावाचे कपडे घातले असल्याचा खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

डॉ. धर्मकारे यांची ११ जानेवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तब्बल दहा पोलीस पथके तयार केली होती. त्यांनी सर्व दिशेने आणि सर्व शक्यता पडताळून तपास केला. विविध पैलूंचा मागोवा घेत तांत्रिक बारकाईने तपास केला. यानंतर ४८ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणून शेख एैफाज शेख अब्रार (वय २२, रा. वसंतनगर पुसद) याने सैयद तौसिफ सैयद खलिल (वय ३५), सैयद मुस्ताक सैयद खलिल ( वय ३२), शेख मौसिन शेख कय्यूम ( वय ३४), शेख शारूख शेख आरम (वय २७, सर्व रा. ढाणकी) यांच्या मदतीने खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले.

यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य आरोपी शेख एैफाज शेख अब्रार हा घटनेनंतर फरारी होता. त्याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार येथून ताब्यात घेतले. ( डॉ. धर्मकारे हत्याकांड प्रकरण )

यानंतर मुख्य आरोपी शेख एैफाज शेख अब्रारने त्याच्या मृत भावाचे कपडे घालूनच डॉक्टरवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. दोन वर्षांपूर्वी शेखच्या भावाचा डॉ. धर्मकारे यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करून त्याने त्याच्या मृत्यूचा वचपा काढण्याच्या हेतूने डॉक्टरची हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

कळमनुरीतून दुचाकी घेतली ताब्यात

आरोपीने हत्त्या केल्यानंतर पळून जाताना जी दुचाकी वापरली होती. ती दुचाकी कलिम खान वजीर खान ऊर्फ बबलू (रा. पठाणवाडी, पुसद) याने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे एका धार्मिक परिसरात लपवून ठेवली होती. पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात घेतली आहे. मुख्य आरोपीने डॉ. धर्मकारे यांच्या हत्येसाठी ११ जानेवारीपूर्वी उमरखेडमध्ये येऊन त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे कबूल केले.

तसेच यापूर्वी एकदा डॉ. धर्मकारे यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन आल्याने पळून गेल्याचेही त्याने सांगितले. या गुन्ह्यात आपल्याला जावई अमजद खान सरदार खान, मामा सैयद तौसिफ सैयद खलिल, सैयद मुस्ताक सैयद खलिल व त्यांच्या मित्रांनी मदत केल्याचीही कबुली दिली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT