चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांनी आयुष्यभर जगभरातील विविध भाषेतील उपलब्ध ग्रंथ साहित्याचे आकलन करुन त्या आधारे विपुल प्रमाणात विविध विषयावर ग्रंथसंपदा उपलब्ध करुन ठेवलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य हा खऱ्या अर्थाने वैश्विक ठेवा आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या मानवतावादी आणि अनेक आंतरराष्ट्रीय समस्याची सोपेपणाने उकल करणारी ग्रंथसंपदा ही जागतिक स्तरावर अनेक विद्यापीठातील अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आता हीच ग्रंथसंपदा मलेशियन विद्यापीठात समाविष्ट केली जाणार आहे. (Dr. Babasaheb Ambedkar)
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अध्यासन
मलेशिया हा देश अतिशय प्रगत देश असल्याने या देशात विद्यापीठातील अभ्यासक्रमात बाबासाहेबांच्या साहित्यसंपदेचा समावेश व्हावा ही अनेक आंबेडकरी अनुयायांची इच्छा होती. या वर्षीचे 'जागतिक आंबेडकरी सम्मेलन' मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. भुपेश पाटील यांनी मलेशिया देशाच्या केंद्रीय सहकार व उद्योग राज्यमंत्री सरसती कंडासामी, भारतीय दुतावासातील राजदूत व उच्च अधिकारी रम्या हिरानय्या तसेच मलेशियन औद्योगिक व व्यापार संघटनेचे उपाध्यक्ष एस एम गोबल यांची भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अध्यासन सुरु करण्याबाबत तसेच बाबासाहेबांची जयंती ही मलेशिया देशात शासकीय स्तरावर साजरी करण्याबाबत निवेदन देऊन याबाबत सादरीकरण सादर केले.
मलेशिया येथील केंद्रीय सहकार व उद्योग राज्यमंत्री सरसती कंडासामी हे स्वतः बाबासाहेबांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. हा विषय येत्या कॅबिनेट बैठकीत सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे लवकरच आता बाबासाहेबांचे वैचारिक साहित्य मलेशिया देशाच्या विद्यापीठातील अभ्यासक्रमात शिकवला जाईल. यामध्ये चिमूरच्या क्रांतीभूमीचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते ॲड भुपेश पाटील यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.