नागपूरः पुढारी वृत्तसेवा
दहावी आणि बारावी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी आज दुपारी शेकडाे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील क्रीडा चौकात एकत्र येत गोंधळ घातला. शहर वाहतूक सेवेची एक बसही फोडली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
फोडलेली बस लगेच अजनी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी ६ ते ८ इंचाच्या मोबाईलवर वर्ग करीत आहेत. प्रश्न उत्तरे सर्वकाही मोबाईल आणि लॅपटॉपवरच सुरू आहे. आता ऑफलाइन परीक्षा घेतल्यास ठी अडचण होणार आहे. टेस्टसुद्धा ऑनलाइन होत आहेत. आता लिहिण्याचा सराव राहिलेला नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेऊ नये, ऑनलाइनच घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.
हेही वाचलत का?