समाज आणि देश सुरक्षेसाठी लावा एक कॅमेरा : कोळसेवाडी पोलिसांचे दुकानदारांना आवाहन | पुढारी

समाज आणि देश सुरक्षेसाठी लावा एक कॅमेरा : कोळसेवाडी पोलिसांचे दुकानदारांना आवाहन

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवलीतील वाढत्या गुन्ह्याची दखल घेऊन कोळसेवाडी पोलिसांनी दुकानदारांनी सामाजिक सुरक्षा आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी आपल्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावून घ्यावे असे आवाहन केले आहे. यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहील आणि मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या गुन्ह्याची उकल करणे सोपे जाईल, १ कॅमेरा समाजासाठी आणि देशासाठी असे आवाहन पाेलिसांनी केले.

कोरोनानंतर बेरोजगारी वाढली आहे. कल्याण डोंबिवलीत चोरी, खून , दरोडे याचा घटना वाढत आहेत. या गुन्ह्याची उकल बऱ्याचवेळा
सीसीटीव्ही कॅमेराद्वारे करणे सोपे जाते. अनेक ठिकाणी महापालिका आणि प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत. असे असले तरी हे कॅमेरा कमी पडत असून अधिकाधिक कॅमेरे लावण्याची गरज आहे. मात्र या कॅमेराचा खर्च अधिक असल्याने प्रशासनावर भार येतो.

त्यामुळे दुकानदारांनी पोलीस आणि प्रशासनाला मदत करण्यासाठी कॅमेरा रस्त्यावर लावला तर गुन्ह्याची उकल करण्यास मदत होईल असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कऱ्हाळे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश मानेपाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख आणि कोळसे वाडी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी करत आहेत. गल्ली सुरक्षित असेल तर शहर सुरक्षित राहत त्यानंतर जिल्हा सुरक्षित होतात., असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलतं का?

Back to top button