Latest

उमर खालीदला जामीन नाकारला : दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील दंगलीच्या कटाचा आरोप असलेला विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालीद याला जामीन नाकारला आहे. जामीन अर्जात काही 'मेरिट' नसल्याचे सांगत, न्यायमूर्तींनी खालीदचा जामीन अर्ज नाकारला आहे.
न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि राजेश भटनागर यांनी हा निर्णय दिला आहे. (Umar Khalid bail plea rejected)

या प्रकरणात ९ सप्टेंबरला सुनावणी झाली होती. सरकारी वकील अमित प्रसाद आणि बचाव पक्षाचे वकील त्रिदीप पैस यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

दिल्ली पोलिसांनी सप्टेंबर २०२०मध्ये उमर खालीदला अटक केली होती. Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) च्या विविध तरतुदींनुसार उमर खालीदवर गुन्हे नोंद आहेत. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. उमर खालीदचा जामीन अर्ज करकडडुमा न्यायालयाने मार्च महिन्या फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. एप्रिल २०२२पासून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT