Latest

‘NCC’च्या विस्तारास मंजुरी! ३ लाख नव्या जागा, माजी सैनिकांना प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नॅशनल कॅडेट कोअर (NCC) च्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे अतिरिक्त ३ लाख कॅडेट जागा निर्माण होतील. या विस्तारामुळे देशभरातील शैक्षणिक संस्थांमधून NCC ची वाढती मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

१९४८ मध्ये केवळ २० हजार NCC कॅडेट्स होते. आता NCC कडे २० लाख कॅडेट्स असतील. यामुळे ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना बनेल. या विस्तार योजनेत चार नवीन गट मुख्यालयांची स्थापना आणि दोन नवीन NCC युनिट्स समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार NCC हा एक वैकल्पिक विषय म्हणून ऑफर केला जात आहे. आता एनसीसीचा विस्तार देशाचे भावी नेते म्हणून महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या दिशेने आणि तरुणांच्या आकांक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल असेल.

या विस्तारामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिक्त पदांचे प्रमाणानुसार वितरण होईल आणि NCC साठी इच्छुक असलेल्या संस्थांची प्रतीक्षा यादी कमी होईल, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

माजी सैनिकांना एनसीसी प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळणार

हा विस्तार शिस्त, नेतृत्व आणि सेवा या भावी नेत्यांना आकार देण्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे. NCC चे उद्दिष्ट आहे की एक परिवर्तनात्मक प्रभाव पाडणे. असे वातावरण निर्माण करणे जिथे युवक राष्ट्र उभारणीत अर्थपूर्ण योगदान देतील. हा उपक्रम 'अमृत पिढी'च्या प्रेरक, शिस्तप्रिय आणि देशभक्त तरुणांचा पाया मजबूत करेल. जे 'विकसित भारत'चे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देतील, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT