पोखरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 देशांतील उच्चपदस्थ अधिकार्यांसमेवत पोखरणमधील भारत शक्ती 2024 युद्धाभ्यासाअंतर्गत संरक्षण दलाच्या थरारक कवायतींची अनुभूती घेतली. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या धाडसी कवायतींमधून भारताच्या सामर्थ्यांचा निनाद जगभर घुमल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.