Latest

Cannes Festival : ‘कान्स’मध्‍ये पांढऱ्या रंगाच्या रफल साडीत दीपिकाची नजाकत

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Festival) आपल्या जबरदस्त लुक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गेले चार-पाच दिवस ती रेड कार्पेटवर एखाद्या परीप्रमाणे अवतरलीय. सध्या कान्स महाेत्‍सवाच्‍या अंतिमच्या दिवशीही दीपिकाने नजाकत दाखविली.

कान्स फिल्म फेस्टिव्हल महोत्सवात आपल्या सौंदर्याने थक्क करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, हिना खान, मीरा कपूर यांनी आपल्या सौंदर्यासोबत नवनवीन फॅशनची जादू दाखवली. ७५ व्या कान्स महोत्सवात ज्यूरी म्हणून दीपिका भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. याच दरम्यान दीपिकाचे एकामागून एक हॉट लूक्स समोर येत आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हल महोत्सव (Cannes Festival) सध्या संपत आला आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा दीपिका पदुकोणच्या पांढऱ्या रंगाच्या साडीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. शेवटच्या दिवशीही दीपिकाने आपल्या सौंदर्यांचा जलवा रेड कार्पेटवर दाखवला. यावेळी दीपिकाचा हटके रॉयल लूक काही चाहत्याना पसंतीस उतरला. तर काहीना आवडला नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी दीपिकाने पांढऱ्या रंगाची रफल साडी आणि मॅचिंग स्ट्रॅपलेस ब्रॅलेटसह मोत्यांनी भरलेला जड नेकपीस कॅरी केला आहे. तसेच यासोबत तिने झुमकेआणि स्लीक बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला. अबू जानी-संदीप खोसला यांनी ही साडी डिझाइन केली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. यात एका युजर्सने 'Loved every Cannes look of yours!!! ???', 'THE BEST DRESSED AT CANNES, Beautiful?', 'क्वीन', 'Wow', 'U r just amazing ❤️', 'Ufff???', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यासोबत ताही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

कान्सच्या पहिल्या दिवसापासून दीपिकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. लाँग गाऊन, ऑफ शोल्डर बॉडी कॉन ड्रेस, हाफ पँट सूट, ऑरेंन्ज गाऊन आणि ग्रीन पोलका डॉट ड्रेस यासारख्या ड्रेसने तिने आपला जलवा दाखवला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT