MPDA : कल्याणमधील कुप्रसिध्द गुंडावर स्थानबद्धेची कारवाई | पुढारी

MPDA : कल्याणमधील कुप्रसिध्द गुंडावर स्थानबद्धेची कारवाई

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंडास एमपीडीए (MPDA) अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. एक वर्षाकरिता त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शाहबाज एजाज सय्यद ( वय २७, रा. जोशीबाग, कल्याण पश्चिम)  असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, दमदाटी तसेच मालमत्तेविषयी व अन्य अशा सात गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत.

ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी शहरात दहशत पसरविणार्‍या व सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button