Latest

दीपक चाहरला क्लीन बोल्ड करणारी ‘ती’ आहे तरी कोण?

backup backup

दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्जचा वेगवाग गोलंदाज. दिपक चाहर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच चर्चेत येण्याच कारण त्याची खेळी नाहीतर वेगळच कारण आहे. पंजाब विरुध्दच्या सामन्यानंतर दिपक चाहरने त्याच्या गर्लफ्रेंडला फिल्मीस्टाईलने प्रपोज केलं.

दीपक चाहरने स्टेडियममध्ये गुडघे टेकुन अंगठी देऊन तिला प्रपोज केले. यादरम्यान एम एस धोनीची बायको साक्षी सिंह धोनी आणि मुलगी जीवाही उपस्थित होती. साक्षीने हा क्षण तिच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

कोण आहे दीपक चाहर ची गर्लफ्रेड?

दीपक चाहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज आहे. तिला पाहताच अनेकांना वाटले ती परदेशी आहे. नंतर दिपक चाहरची बहिण मालती चाहरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खुलासा केला. दिपक चाहरच्या गर्लफ्रेंडचं नाव जया भारद्वाज आहे अस तिने सांगितलं. ती विदेशी नाही, जया दिल्ली येथे राहते. सगळीकडे शोधल्यानंतर समजल की, जया भारद्वाज ही बिग बॉस फेम सिध्दार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिध्दार्थ भारद्वाजचं नाव टीव्ही दुनियेतील प्रसिध्द नाव आहे.

चेन्नईची झाली हार

पंजाब विरुध्दच्या मॅचमध्ये दीपक चाहरची खेळी काही खास नव्हती. चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जने ६ विकेट राखून मोठा पराभव केला. टॉस जिंकुन चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी केली.

चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्ज इलेव्हन सामन्यात चेन्नईने पंजाबसमोर १३५ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. चेन्नईकडून फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक ७६ धावा केल्या. प्रत्युतरात खेळणाऱ्या पंजाबने हे १३५ धावांचे आव्हान १३ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार केएल राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावांची तुफानी खेळी केली. ही खेळी त्याने ८ षटकार आणि ७ चौकारांनी सजवली.

हेही वाचलत का:?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT