पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शेन वॉर्नचे नाव आघाडीवर येते. क्रिकेट जगताने त्याच्या रुपात एक दुर्मिळ हिरा गमावला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने अनेक ऐतिहासिक यश संपादन केले, मग ते संघाचे यश असो वा वैयक्तिक विक्रम. पण हेही तितकेच खरे आहे की, त्याच्या कारकिर्दीत आणि त्यानंतरही तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकला आणि चर्चेत राहिला. (shane warne lifestyle)
एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्यामागे वॉर्नला सिगारेट आणि दारूचे व्यसन हे प्रमुख कारण मानले जाऊ शकते. वॉर्न अनेकवेळा मैदानात सिगारेट ओढतानाही दिसला होता. तसेच तो जास्त मद्यपान करत असे. 2007 मध्ये न्यूलँडमध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेदरम्यान वॉर्न धूम्रपान करताना पकडला गेला होता. दोन तरुण मुलांनी त्यांच्या मोबाईलमध्ये वॉर्नचे धूम्रपान करतानाचे छायाचित्र टिपले. धुम्रपान करतानाच्या या छायाचित्रांवरून वॉर्नचे या मुलांशी भांडणही झाले होते. (shane warne lifestyle)
क्रिकेटविश्वातील महान लेग-स्पिनर शेन वॉर्न मैदानावर जितका लोकप्रिय होता तितकाच गलिच्छ बोलणे आणि अश्लील संदेश मॅसेज पाठवण्यबद्दल वादग्रस्त राहिला. त्याच्यावर ड्रग्ज, सेक्स स्कँडल असे सर्व प्रकारचे आरोप झाले. अंमली पदार्थ आणि अनुशासनहीनतेमुळे त्याच्यावर क्रिकेट खेळण्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. वॉर्नची प्रतिमा पहिल्यांदा 2000 मध्ये डागाळली होती जेव्हा ब्रिटिश नर्स डोना राइटने वॉर्नवर मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. डोनाने वॉर्नवर आरोप केला आहे की, 'वॉर्न तिच्याकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो, याशिवाय वॉर्न फोनवर घाणेरडे बोलतो आणि अश्लील मेसेजही पाठवतो.' (shane warne lifestyle)
एवढेच नाही तर 2003 मध्ये अँजेला नावाच्या एका महिलेने वॉर्नवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. 2006 मध्ये एका मासिकाने वॉर्नचा एक फोटो प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये तो दोन मॉडेलसोबत होता. वॉर्नचे तिच्यासोबत अफेअर असल्याचा दावा मॉडेल्सने केला होता. एका मॉडेलने सांगितले की, 'वॉर्न पूर्णपणे फिट आहे, त्याने आम्हा दोघांचे पूर्ण समाधान केले.' तर जानेवारी 2015 मध्ये एका 43 वर्षीय महिलेने शेन वॉर्नसोबतचे लैंगिक संबंध उघड केले होते.
10 वर्षे पत्नीसोबत राहिल्यानंतर वॉर्नने घटस्फोट घेतला तेव्हा त्याच्या आयुष्यात महिलांची ओढ लागली होती. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, शेन वॉर्नच्या आयुष्यात आतापर्यंत एकूण 10 महिला आल्या.
वॉर्नवर एका पॉर्न स्टारने मारहाण केल्याचा आरोपही केला होता. याशिवाय वॉर्नवर मॅच फिक्सिंगचेही आरोप झाले. 1994 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या शेन वॉर्नने कबूल केले की, तो आणि त्याचा सहकारी मार्क वॉ एका भारतीय बुकीला सामन्यापूर्वी खेळपट्टी आणि हवामानाची माहिती देत असे. त्या बदल्यात तो बुकीकडून भरघोस रक्कम मिळवायचा.