Latest

India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 | पाकिस्तानला ‘विराट’ नावाची भीती! चाहत्यांचा उत्साह शिगेला

दीपक दि. भांदिगरे

अहमदाबाद, पुढारी ऑनलाईन : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये आज भारत-पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हाय होल्टेज सामन्याच्या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यातील अनेकांनी निळ्या रंगाची भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घातली आहे. याचे अनेक व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने X वर शेअर केले आहेत. एका क्रिकेट चाहत्याने म्हटले आहे की, "पाकिस्तानला विराट कोहली या नावाची भीती वाटते. तो आज शतक ठोकेल." (India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023)

संबंधित बातम्या 

"विराट कोहली हा आजच्या सामन्याचा हिरो असेल. जेव्हा तो पाकिस्तानविरुद्ध खेळतो तेव्हा तो नेहमीच खास असतो. तो नाबाद राहतो," असे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर बोलताना दुसऱ्या एका क्रिकेट चाहत्याने म्हटले.

आणखी एका क्रिकेट चाहत्याने म्हटले आहे की "मी खूप उत्साहित आहे. २०११ मध्ये मला सामन्याची तिकिटे मिळाली नव्हती पण आज मी या सामन्यासाठी आलो आहे."

एका चाहत्याने म्हटले आहे की, "आम्ही सर्वजण उत्साही आहोत. आज रोहित आणि विराट चांगली कामगिरी करतील. आम्ही भारतासाठी जयघोष करणारे १२वा खेळाडू आहोत!"

वंश नावाच्या आणखी एका चाहत्याने सांगितले की, "यापेक्षा मोठे आणि चांगले काहीही असू शकत नाही! आम्ही त्यांना सोडणार नाही; हा सिलसिला सुरूच राहील. शून्य हा क्रमांक आहे जो पाकिस्तानसाठी बदलणार नाही!"

अभिषेक नावाच्या एका चाहत्याने म्हटले की, "मी मुंबईहून मित्रांसोबत हा सामना पाहण्यासाठी आलो आहे. काल रात्री मी झोपलो नाही. भारत आजचा सामना सहज जिंकेल."

भारताने त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानवर विजय मिळवून केली. तर पाकिस्तानने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. यामुळे आज होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT