पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविड १९ चा नवीन ओमायक्रॉन XBB.1.5 सबव्हेरिएंट जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. ज्यावर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क घालण्याचा सल्ला द्यावा, असे डब्ल्यूएचओने सर्व देशांना आवाहन केले आहे.
डब्ल्यूएचओचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवूड यांनी मंगळवारी (दि. १०) सांगितले की, लांब पल्ल्याच्या आणि उच्च जोखमीच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मास्क घालण्याचा सल्ला दिला पाहिजे. देशांनी प्रवासापूर्वीची चाचणी पुरावा म्हणून ठेवणे आवश्यक आहे. कारवाईचा विचार केल्यास, भेदभाव न करता प्रवासी उपायांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. चीन कोरोनाचा खरा अहवाल देत नाही, हे डब्ल्यूएचओसह अनेक शास्त्रज्ञांना माहित आहे. चीनमध्ये कोविड-19 मृत्यू म्हणून काय गणले जाते याची माहिती WHO ला आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी चीनमधील प्रवाशांकडे कोविड चाचणी बंधनकारक केली असल्याचेही स्मॉलवूड यांनी सांगितले.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकार्यांनी सांगितले की, ओमायक्रॉन व्हेरियंट XBB.1.5 हे अत्यंत संक्रामक आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्येपैकी 27.6 टक्के कोरोना प्रकरणांसाठी तो व्हेरियंट जबाबदार आहे. युरोपमधील अनेक देशांमध्येही व्हेरियंट आढळून आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. XBB.1.5 मुळे जागतिक संक्रमणाची लाट निर्माण होईल की नाही हे अस्पष्ट आहे. पण सध्याच्या कोविड लसी गंभीर लक्षणे, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूपासून संरक्षण करत असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :