नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येवर आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांसंबंधी निर्देश दिले. (corona guidline)
अस्थायी रूग्णालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करून घरगुती विलगीकरणातील रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्याच्या सूचना भूषण यांच्याकडून देण्यात आल्या आहे.
रॅपिड टेस्ट वाढवण्यासह जिल्हा पातळीवर आवश्यक औषधे तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आला आहे. देशात दररोज २० लाखांहून अधिक कोरोना तपासण्या करण्याची क्षमता आहे. अशात राज्यांनी कोरोना तपासण्यांना वेग देण्याच्या सूचना पत्रातून देण्यात आल्याचे कळतेय.
कोरोनाबाधितांची संख्या वाढताच कोरोना तपासण्यांची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता पडल्यास रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना देखील केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
कोरोनावर आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रूग्णालयांसह सर्व डिस्पेंसरिना रॅपिड टेस्ट करण्याची परवानगी द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाकडून गल्ली, वस्तीत रॅपिड अँटीजन टेस्टसाठी शिबिरे लावण्याचे देखील सूचवण्यात आले आहे.
कोरोना तपासण्यासाठीच्या मान्यताप्राप्त सातही किटच्या मुबलक प्रमाणात खरेदी करुन आरोग्य यंत्रणेला मजबूत करून लसीकरण अभियानाला वेग देण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनूसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंध लावण्यासह बफर तसेच कंटेनमेंट झोन बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचलं का?