Latest

LokSabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ;  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला असून, केंद्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या मंजुरीनंतर येत्या काही दिवसांत तो प्रसिद्ध केला जाईल. ( LokSabha Election )

संबंधित बातम्या 

या जाहीरनाम्यात रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्याय या विषयांवर काँग्रेसने भर दिला आहे. जातनिहाय जनगणना, शेतीमालाला हमीभाव कायदा तसेच तरुणांना नोकर्‍यांचे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्रातील 30 लाख रिक्त पदे भरण्यात येतील, असेही म्हटलेले आहे.

महिलांना दरमहा 6 हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा उल्लेख जाहीरनाम्यातून असून मागास जातींसाठी आरक्षण मर्यादा वाढवण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे.

हीदेखील आश्वासने

शासकीय परीक्षा फॉर्म मोफत
पेपरफुटीविरोधात कडक कायदा
अग्निपथ योजना बंद करू
कुशल बेरोजगार, पदवी, पदविकाधारकांना भत्ता
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या वाढवणार
स्वस्त गॅस सिलिंडर
'मनरेगा'चे दैनंदिन वेतन 400 रुपये
जातीभेदाविरुद्ध रोहित वेमुला नावाचा कायदा
आरोग्य विमा योजना
ग्रामीण मुलांना क्रीडा शिष्यवृत्ती
कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचार व सुयोग्य वापर करावा. ( LokSabha Election )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT