Gal Gadot : 'वंडर वूमन' चौथ्यांदा बनली आई, ३८ व्या वर्षी दिला मुलीला जन्म | पुढारी

Gal Gadot : 'वंडर वूमन' चौथ्यांदा बनली आई, ३८ व्या वर्षी दिला मुलीला जन्म

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘वंडर वुमन’ फेम हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅडोट चौथ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  (Gal Gadot) तिने सोशल मीडियावर आपली मुलीची पहिली झलक दाखवत पोस्ट शेअर करून फॅन्ससोबत खुशखबरी शेअर केली आहे. (Gal Gadot)

हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटातून अभिनय करून स्वत:ला सिद्ध केलेल्या गॅलचा वेगळा चाहता वर्ग आहे. डिज्नी वर्ल्डची ‘वंडर वुमन’ बनून तिने आपली प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध केली होती.

गॅल गॅडोटने मुलीला दिला जन्म

‘वंडर वुमेन’ अभिनेत्रीने ६ मार्च रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. तिने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधून आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. पोस्ट शेअर करून फॅन्ससोबत ही खुशखबरी शेअर केली आहे. पण ती प्रेग्नेंट असल्याची माहिती कुणालाच नव्हती. या पोस्टनंतर तिने फॅन्सना सरप्राईज दिलं आहे. तिने इस्त्रायली रिअल इस्टेट डेव्हलपर यारोन वर्सानोशी २००८ मध्ये लग्न केले होते. या कपलला तीन मुले आहेत. आता तिने चौथ्यांदा बाळाला जन्म दिला आहे.

मुलीचे ‘हे’ ठेवलं नाव

तिने इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधून आपल्या बाळासमवेतचा एक फोटो शेअर केला आहे. तिने सोबत कॅप्शनमध्ये एक नोट लिहिली आहे. तिने आपल्या मुलीचे नाव एक प्रेमळ नोट लिहिली आहे. सोबतचं आपल्या मुलीचे नावदेखील सांगितलं. तिने आपल्या मुलीचे नाव ओरी (Ori) ठेवलं आहे. याचा हिब्रूमध्ये अर्थ होतो- ‘मेरी रोशनी’. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- “माझी प्रेमळ मुलगी…तुझं स्वागत आहे. गर्भावस्था इतकं सोपं नव्हतं…. आणि आम्ही हे पार केलं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

Back to top button