Latest

Chinese flag : गलवान खोऱ्यात चीनी झेंडा फडकला तरी मोदी सरकारची चुप्पी !

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चीन आणखी एकदा भारताची कुरापत काढली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी गरवान खोऱ्यात चीन आपला झेंडा फडकवला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडिया युजर्स पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहेत. (Chinese flag)

या व्हिडीओमध्ये चीनी सैनिक गलवान खोऱ्यात आपल्या देशाचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. "गलवान व्हॅलीवर चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकला", अशा आशयाचे कॅप्शनदेखील त्यांनी दिलेले आहेत. या व्हिडीओवरून मोदी सरकारवर सोशल मीडियावरून प्रचंड टीका केली आहे. यावर काॅंग्रेसचे नेते राहुल गांधींनीही ट्विट करून पंतप्रधान यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

राहुल गांधींनी संंबंधित व्हिडीओ शेअर करत म्हणाताहेत की, "गलवानच्या भूमीवर आमचा तिरंगाच चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावं लागेल. मोदीजी आतातरी मौन तोडा!", अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. गायक व संगीतकार विशाल ददलानी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

ददलानींनी म्हटलं आहे की, "नमस्कार नरेंद्र मोदी, अमित शहा. लाल डोळे राहू द्या. चीनने भारताची भूमी काबीज केली आहे, यावर एकदा तरी बोलून दाखवा. शौर्याची भाषा करणारे आता गप्प का बसलेत?", असा प्रश्न नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना ददलानींनी विचारला आहे.

यापूर्वीही गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या अतिक्रमणामुळेच भारतीय सैन्य आि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झालेला होता. त्यामुळे सीमाभागात तणावही बराच काळ होता. पण, २०२२ वर्षाच्या सुरूवातीलाच गलवान खोऱ्यातील चीनच्या अतिक्रमणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा हा वाद सोशल मीडियावर उफाळून आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT