Chinese Balloon  
Latest

Chinese Balloon : ‘स्पाय बलून’ पाडल्याबद्दल चीनकडून अमेरिकेचा निषेध

सोनाली जाधव

 पुढारी ऑनलाइन डेस्क :  चीनचा स्पाय बलून अमेरिकेने फोडून खाली पाडल्याबद्दल चीनने तीव्र असंतोष आणि निषेध व्यक्त केला आहे. चीनने पुन्हा एकदा असा दावा केला आहे की हा फुगा "नागरी वापरासाठी होता'. अमेरिका "आंतरराष्ट्रीय सरावाचे गंभीर उल्लंघन करत आहे" असे म्हणत चीनने अमेरिकेने आपल्या फुग्याला खाली पाडण्याच्या  विरोधात "तीव्र असंतोष आणि निषेध" व्यक्त केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनने अमेरिकेने ही घटना शांत, व्यावसायिक आणि संयमी पद्धतीने हाताळावी. यावर अमेरिकेच्या लष्करी नेत्यांनी सांगितले की त्यांना खात्री आहे की हे विमान हेरगिरीसाठी वापरले गेले होते. वाचा सविस्तर बातमी. (Chinese Balloon )

अमेरिकेने शनिवारी देशाच्या आग्नेय किना-यावरून तरंगत असताना संशयित चिनी गुप्तहेर फुगा खाली पाडला. या आठवड्याच्या सुरुवातीला लष्करी अधिका-यांनी चीनचा हा संशयित फुगा खाली पाडण्याची शिफारस केली होती. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा फुगा पाडण्यासाठी लष्करी योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर हेरगिरी करण्यासाठी चीनने पाठवलेला हा फुगा फोडण्यासाठी प्रथम आपले हवाई क्षेत्र मोकळे करून घेतले. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने "राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रयत्नासाठी दक्षिण कॅरोलिनातील मर्टल बीच आंतरराष्ट्रीय विमानतळासह शनिवारी तीन विमानतळांवर येणा-या आणि जाणा-या सर्व फ्लाइट्स थांबवल्या. FAA ने दक्षिण कॅरोलिना किनार्‍याभोवतीचे हवाई क्षेत्र मोकळे करण्यासाठी तात्पुरते उड्डाण प्रतिबंध जारी केले.

एरॉयटर्सच्या छायाचित्रकाराने याबाबत सांगितले की, संशयित चिनी गुप्तहेर बलून अमेरिकेच्या दक्षिणपूर्व किनारपट्टीवर खाली पाडण्यात आला. "जेटमधून एक प्रवाह आला, फुग्यावर Chinese balloon आदळला पण स्फोट झाला नाही.

Chinese Balloon : आंतरराष्ट्रीय सरावाचे उल्लंघन – चीन

अमेरिकेच्या या कृतीनंतर चीनने असंतोष आणि निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेचे असे म्हणणं आहे की,"हा फुगा नागरी वापरासाठी होता. अमेरिका "आंतरराष्ट्रीय सरावाचे गंभीर उल्लंघन करत आहे. तर तर तैवान सरकराने आज (दि.५)  सांगितले की चीनी बलूनची घटना ही "सुसंस्कृत आंतरराष्ट्रीय समुदायाने सहन करु नये. पुढे असेही म्हंटलं आहे की,"चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या अशा कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतात, इतर देशांच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करतात, त्याचबरोबर त्यांच्या सार्वभौमत्वाचेही उल्लंघन करतात.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT