कोल्हापूर : लोकसंख्येत 2023 अखेरीसच भारत चीनच्या पुढे? | पुढारी

कोल्हापूर : लोकसंख्येत 2023 अखेरीसच भारत चीनच्या पुढे?

कोल्हापूर : संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अलीकडेच जाहीर केलेल्या लोकसंख्याविषयक अहवालामध्ये भारत जुलै 2023 मध्ये लोकसंख्येच्या आघाडीवर चीनला मागे टाकेल, असे म्हटले होेते. तथापि, जागतिक लोकसंख्या पुनर्रनिरीक्षण या स्वायत्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारताने 2022 मध्येच चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून आघाडी घेतल्याचे म्हटले आहे. यामुळे या लोकसंख्येच्या आकडेवारीचा विचार करता भारतीय व्यवस्थेवरील जबाबदारी वाढली आहे.

लोकसंख्येची वाढ ही विकासाला खिळ घालणारी ठरते. हा विचार आता जागतिक पातळीवर आता सर्वमान्य झाला आहे. ज्या देशाला जन्मदर रोखणे अधिक कुशलतेने जमते, तो देश प्रगतिपथावरून वाटचाल करू लागतो. यासाठी संयुक्त राष्ट्राने प्रजननाचा दर प्रतिमहिलेमागे 2.1 च्या खाली राहिला पाहिजे, असे प्रमाण निश्चित केले.

जागतिक नकाशावर सर्वाधिक लोकसंख्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या चीनने त्याचे गांभीर्याने अनुकरण केले. लोकसंख्या वाढीचे हे संकट ओळखून चीनने पावले टाकण्यास पूर्वीच सुरुवात केली होती. 1990 मध्ये चीनचा प्रजननाचा दर 2.51 इतका होता. तो 2020 मध्ये 1.28 पर्यंत खाली आणून चीनने लोकसंख्येवर नियंत्रण केले.

Back to top button