Democracy Index 2022 : लोकशाही निर्देशांकात रशिया, चीन, पाकची घसरण : भारताच्या स्थितीत सुधारणा | पुढारी

Democracy Index 2022 : लोकशाही निर्देशांकात रशिया, चीन, पाकची घसरण : भारताच्या स्थितीत सुधारणा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : ग्लोबल डेमॉक्रसी इंडेक्स 2022 अंतर्गत 167 देशांतील लोकशाहीच्या स्थितीचा अहवाल जारी झाला आहे. निवडणूक प्रक्रिया, सरकारची कार्यपद्धती आणि नागरी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने विविध देशांचा क्रम ठरविण्यात आला आहे. चीनने याबाबतीत गेल्या 2 दशकांतील सर्वाधिक नीचांकी पातळी गाठली आहे. (Democracy Index 2022)

रशिया 22 व्या स्थानावरून 146 व्या स्थानी घसरला आहे. भारताच्या स्थितीत मात्र सुधारणा झाली आहे. भारत आता 46 व्या स्थानावर आला आहे. या आधी आपण 53 व्या स्थानावर होतो. पाकिस्तान या यादीत 107 व्या स्थानी आहे. (Democracy Index 2022)

विविध देश, त्यांचे स्थान

चीन 156, अमेरिका 30, बांगला देश 73, नेपाळ 101, अफगाणिस्तान 167, म्यानमार 166, उत्तर कोरिया, 165 सिरिया 163, कांगो 162.

Democracy Index 2022

टॉप टेन देश

  1. नॉर्वे
  2. न्यूझीलंड
  3. आईसलँड
  4. स्वीडन
  5. फिनलँड
  6. डेन्मार्क
  7. स्वित्झर्लंड
  8. आयर्लंड
  9. नेदरलँड
  10. तैवान

अधिक वाचा : 

Back to top button