पुढारी ऑनलाईन डेस्क
चेन्नईत विशेष सुरक्षा असणारे भाजपचे नेते बालचंद्रन यांची हत्या करण्यात आली. ( Murder of BJP Leader ) ते राज्यातील अुनसूचित जाती-जमाती विभागाचे अध्यक्ष होते.
बालचंद्रन यांनी आपली हत्या होईल, अशी भीती काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. यानंतर त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली होती. बालचंद्रन यांचे सुरक्षा रक्षक हे चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघा मारेकर्यांनी भर रस्त्यात जीवघेणा हल्ला केला. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पूर्ववैमन्स्यातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मारेकर्यांना अटक करण्यासाठी विेशेष तपास पथक
निय्क्त केले आहे. काही तासांमध्ये आरोपी गजाआड केले जाईल, अशी माहिती चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जीवाल यांनी दिली.
परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, या घटनेचा विरोधी पक्ष नेते एल. के. पल्लानीस्वामी यांनी तीव्र निषेध केला आहे.राजधानी चेन्नईत मागील २० दिवसांमध्ये १८ खून झाले आहेत. तामिळनाडूची राजधानी ही खुन्याचे शहर झाले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :