चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा (जि.चंद्रपूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावभर फेरी काढून शाळेतील शिक्षक वेळेवर येत नाहीत आणि शिकवत नाही, असा ठपका ठेवून शाळेतील प्रकार उघड्यावर आणला. तसा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित झाला आणि शिक्षण विभागात चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकाराची दखल घेत राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी कोसंबी येथील जिल्हा परिषद शाळेला शुक्रवारी (दि.४) आकस्मिक भेट दिली. दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून घेत शिक्षकांचा चांगलाच समाचार घेतला. (Chandrapur News )
Chandrapur News : शिक्षकांचे अशैक्षणिक वर्तन
माहितीनुसार कोसंबी येथील येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहे. या वर्गांसाठी पाच शिक्षक आहेत. त्यांच्या नियमित शैक्षणिक कार्यात बरीच तफावत दिसून येत आहे. शिक्षकांच्या मनमानी कारभारावर येथील विद्यार्थी संतप्त असल्याने त्यांनी गावभर फेरी काढून शाळेतील प्रकार उजेडात आणला. शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही, अभ्यासक्रम सोडून भजन शिकवतात, मोबाईलवर जास्त व्यस्त असतात, बेशिस्तपणा स्वतः पाळतात, शाळेत फक्त खाण्यासाठी येता असे, अशैक्षणिक वर्तन असल्याचे विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान सांगितले.
शिक्षकांची कानउघाडणी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारी (दि.४) आमदार विजय वडेट्टीवार यांनी शाळेला आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी आमदार वडेट्टीवार यांच्यापुढे आपले मत व्यक्त केले. यावेळी शिक्षकांचा लेट लतीफपणा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होताच माजी मंत्री वडेट्टीवार यांनी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या समक्ष चांगलीच कानउघाडणी केली. मुख्यालयी न राहता कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता देय असू नये, असे आदेश दिले. शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर पुढील कारवाई करण्यात येईल, असे यावेळी आमदार वडेट्टीवार यांनी सांगितले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.