मोठी बातमी : ठरलं तर ! पोटनिवडणुकीसाठी कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडला अश्विनी जगताप भाजपाचे उमेदवार

मोठी बातमी : ठरलं तर ! पोटनिवडणुकीसाठी कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडला अश्विनी जगताप भाजपाचे उमेदवार

पुढारी ऑनलाईन : पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आता संपली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कसबा पेठ मतदार संघातून रासने यांची निवड होण्यापूर्वी या जागेसाठी ५ जणांच्या नावात चुरस होती. त्यापैकी मुक्ता टिळक यांच्या घरातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक, हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांची नावं चर्चेत होती. त्यापैकी हेमंत रासने यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. रासने यांनी यापूर्वी तीनवेळा नगरसेवक पद भूषवलं आहे. तर त्यांना चारवेळा स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली होती.

एकीकडे भाजपाचे उमेदवार जाहीर झाले असताना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी मात्र उमेदवार जाहीर करण्यात कोणतीही घाई केलेली दिसत नाही. नुकतीच चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची बैठक मुंबईत संपन्न झाली. त्यामुळे महाविकास आघाडीही लवकरच पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करेल असं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news