सोयगाव: आजाराशी झुंज देणाऱ्या तरूण मुलीवर पैशांअभावी वैद्यकीय उपचार झाले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने असहाय्य झालेल्या हतबल पित्यानेही पाठोपाठ गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही हृदयद्रावक घटना सोयगाव येथे रविवारी (दि.७) रात्री उशिरा घडली. वैष्णवी दीपक राऊत (वय १९) असे मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तर दीपक राऊत (वय ४२, रा. सोयगाव) असे अभागी पित्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) नगरपंचायतीमध्ये दीपक राऊत पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते. दरम्यान, नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यांपूर्वी कुठलीच सूचना न देता तडकाफडकी निलंबित केले होते. त्याचबरोबर त्यांचे मासिक वेतन ही रोखून ठेवले होते. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. त्यातच त्यांची मुलगी वैष्णवी आजाराशी झुंज देत होती. पैसाअभावी तिच्यावर वेळेत उपचार न झाल्याने तिचा रविवारी (दि.८) मृत्यू झाला. याचा मानसिक धक्का दीपक यांना बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्ययसंस्कार केल्यानंतर रविवारी रात्री २ वाजता घरात गळपास घेऊन जीवन संपविले.
दरम्यान, कुटुंबीय व नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक यांचा मृतदेह नागरपंचायतसमोर आणून ठेवला. जो पर्यंत दीपक यांना न्याय मिळत नाही. व नगर पंचायत मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यत मृतदेह उचलणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यावेळी नगर पंचायतीच्या आवारात मोठा जमाव जमा झाला होता. नगरपंचायतीच्या एकाही अधिकारी व कर्मचारी, नगराध्यक्ष यांनी याठिकाणी उपस्थिती लावली नाही. त्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेहावर नगरपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्यावर ठाम होते.
हेही वाचा