छ.संभाजीनगर: येसगावजवळ छोटा हत्ती – दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, १ जण जखमी | पुढारी

छ.संभाजीनगर: येसगावजवळ छोटा हत्ती - दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, १ जण जखमी

सुलतानपूर: पुढारी वृत्तसेवा : खुलताबाद- फुलंब्री महामार्गावरील येसगावजवळ छोटा हत्ती आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन १ ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.११) सकाळी अकराच्या दरम्यान घडली. अनिल राजू माळी (वय २४, रा. सुलतानपूर) असे मृताचे नाव आहे. तर अशोक उत्तम गुंजाळ (वय २६, रा. सुलतानपूर) असे जखमीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुलतानपूर येथील रहिवाशी अनिल माळी आणि अशोक गुंजाळ हे फुलंब्रीकडून सुलतानपूरला दुचाकीवरून येत होते. यावेळी येसगाव येथे शिवाजी खंडागळे यांच्या घरासमोरून छोटा हत्ती सुलतानपूरहुन फुलंब्रीकडे जात होता. यावेळी छोटा हत्ती आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अनिल आणि अशोक गंभीर जखमी झाले.

परिसरातील नागरिकांनी आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेऊन जखमी अनिल व अशोक यांना फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अनिलला तपासून मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बिगोतव, संतोष पुंड करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button