पुढार ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या वतीने आज सैन्यदलातील भरती होण्यासाठीची अग्निपथ भरती योजनेची घोषणा करण्यात आली. तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेचे यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी लष्कर प्रमुख मनोज पांडे, नौदल प्रमुख आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख विवेक राम चौधरी उपस्थित होते.
दोन आठवड्यांपूर्वी भुदल, हवाई दल आणि नौदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी
अग्निपथ योजनेची माहिती दिली होती. भारतीय सैन्यदलात कमी कलावधीसाठॅची सैन्य भरतीचा मार्ग मोकळा होता.
अग्निपथ भरती योजनेनुसार तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यदलात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या याेजनेमुळे लष्कराच्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचा खर्चात कपात हाेण्यास मदत हाेणार आहे. या योजनेतंर्गत दरवर्षी सुमारे ४५ हजार युवकांची सैन्यदलात भरती होईल. यासाठी १७ वर्ष ५ महिने ते २१ वर्षांपर्यंतच्या युवकांनाच भरतीची संधी असेल. ते सलग चार वर्ष सैन्यदलात सेवा देतील. या चार वर्षांमधील पहिले सहा महिने त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. या सैनिकांना सुमारे ३० हजार ते ४० मासिक वेतन दिले जाईल. तसेच अन्य फायदेही दिले जातील. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये असणार्या जवानांप्रमाणेच कामगिरीनुसार पुरस्कारही मिळेल. तसेच विमा कवचही लाभेल.
चार वर्षांनंतर या योजनेतंर्गत भरती झालेले ८० टक्के सैनिक हे सेवामुक्त होतील. तसेच त्यांना पुढील रोजगाराच्या संधीसाठी सशस्त्र दलांची मदत मिळेल. अनेक ठिकाणी सैन्यदलात काम केलेले शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध होणार आहे.
संरक्षण दलाने अशा प्रकारची सैन्यदल भरती करण्यापूर्वी आठ देशांमधील भरती प्रक्रियेचा अभ्यास केला. यानंतर भारतासाठी एक भरती कार्यक्रमाची आखणी केली. या योजनेचे वैशिष्ट म्हणजे. चार वर्षांमध्ये सैन्यदलातील नोकरीनंतर दुसर्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी भारतीय सैन्यदलच मदत करणार आहे.
हेही वाचा :