मुंबई : पुढारी ऑनलाईन
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पण पहिल्याच दिवशी विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झाले. सभागृहात एकच गदारोळ उडाला, ज्यामुळे राष्ट्रगीत सुरू करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अक्षरश: विनंती करावी लागली. यादरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून सभागृहात घोषणाबाजी झाली. दरम्यान, शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिषाणात गोंधळ झाल्याने राज्यपाल सभागृहातील अभिभाषण अर्धवट सोडून गेले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यपालांचं वक्तव्य अतिशय अयोग्य आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यारून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. आम्ही शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. राज्यपालंविरोधात प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले.
दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सरकारला घेरण्यासाठी भाजपची रणनीती ठरवलीय. जन-गण-मन घेऊ द्या, अशी राज्यपालांना विनंती करावी लागली.