Taapsee Pannu 
Latest

Taapsee Pannu : तापसी पन्नू पुन्हा भडकली; आधी आवडायची पण आता…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ( Taapsee Pannu ) तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि बिनधास्त अंदाजासाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. काही वेळी ती तिचे बेधडक मत मांडते असते. तर कधी-कधी ती नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. यासोबत ती सोशल मीडियावरून युजर्सना आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देत असते. याच दरम्यान तापसीचा पुन्हा एकदा फोटोग्राफर्सवर भडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. परंतु, यावेळी असे नेमके काय घडले? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

याआधी तापसीने (Taapsee Pannu) ओटीटी प्ले अवॉर्ड्स 2022 ला हजेरी लावली होती. याच दरम्यान ती 'आधी नीट अभ्यास करून या आणि मग मला प्रश्न विचारा'. असे म्हणत प्रसार माध्यामांवर भडकली होती. सध्या अशीच आणखी एक घटना तिच्या बाबतीत घडली असून यावेळी कारण मात्र, वेगळे आहे. तापसीचा एक व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. परंतु, यावेळी तापसी एका शुल्लक कारणांनी भडकल्याची दिसतेय.

यावेळी तापसी एका बिल्डिंगमधून बाहेर आल्यानंतर तिच्या कारमध्ये बसण्यास जात असते. परंतु, यावेळी तिच्यावर पापाराझीची नजर पडते. यावेळी तिचे फॅन्स तिला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतात आणि थोडा वेळ थांबून फोटो काढूयात असे म्हणतात. परंतु, तापसीसा गाडीतून जायचे असते यामुळे ती कारकडे जाण्यास निघते. यानंतर तेथील फोटोग्राफर्सने तिच्या कारचा दरवाजा लॉक करतात. यावर तापसी मात्र, जोरजोरात 'असे करू नका, असे वागू नको' म्हणते. याच दरम्यान तापसीचा पारा चढतो आणि तेथील सर्वांवर ती भडकते. यानंतर काही वेळात कारमध्ये बसून निघून गेली. तापसीला थांबवण्यासाठी असे करण्यात आलेले असते.

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. यात काही नेटकऱ्यांनी तापसीचे हे वागणे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. एका युजर्सने कॉमेंन्टस करताना 'याआधी खूपच आंनदीत असायची. आता काय झालयं? मी तापसीचे अलीकडे भांडतानाचे अनेक व्हिडिओ पाहत आहे. तर दुसऱ्या एकाने 'मला ती आवडायची परंतु, आता अजिबात आवडत नाही. ती राखीपेक्षा चांगली आहे' असे म्हटले आहे. याच दरम्यान काही नेटकऱ्यांनी तिची तुलना जया बच्चन यांच्याशी केली आहे. कारण बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनादेखील फोटो काढणे फार आवडत नाही. तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची अनुराग कश्यपसोबतच्या 'दोबारा' या चित्रपटात दिसली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT