Latest

Hrithik Roshan : हृतिक रोशनपेक्षा हॅडसम दिसू लागला त्याचा मुलगा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या रिलेशनशीपमुळे गेल्या काही दिवसांत चांगलाच चर्चेत आला होता. हॅडसम हृतिकसोबत अभिनेत्री सबा आझाद दिसली होती. यानंतचर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं होतं. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? हृतिकचा ( Hrithik Roshan )  मुलगा रेहान सुद्धा त्याच्यापेक्षा खूपच हॅडसम दिसत आहे. सध्या हृतिक आणि सुझैन यांच्या मुलगा रेहानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) आणि सुजैन खानचा मोठा मुलगा रेहानने नुकतेच आपला १६ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा एक फोटो सुझैनने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सुझैन खानसोबत तिची दोन मुले रेहान आणि रिदान दिसत आहेत. यावेळी दोन्ही मुलाच्यामध्ये उभारून सुझैनने हटके पोझ दिली आहे. यावेळी सुझैन पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर रेहानने पांढऱ्या रंगाच्या टिशर्ट आणि ब्लॅक रंगाच्या पायजमा परिधान केली होती. तर रिदानने ब्लॅक रंगाच्या टिशर्ट आणि पांढऱ्या रंगाची पायजमा परिधान केला आहे.

हा फोटो शेअर करत सुजैनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Whatever it takes..Here is to the adrenaline in my veins… Heartmonsters #Raystar #Ridzsky ♥️♥️♥️♥️♥️.' या फोटोवरून रेहान हृतिक रोशनसारखा हॅडसम दिसत असल्याचे बोलले जात आहे. या फोटोत सर्वजण ग्लॅमरस दिसत आहेत.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'वडिलापेक्षा हॅडसम रिहान आहे'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'हृतिकनंतर रेहान बॉलिवूडचा दुसरा हँडसम डूड बनेल हे खास आहे'. असे म्हटले आहे. काही चाहत्यांनी फोटोवरून 'सुजैनला मम्मी नसून बहिण असल्याचे वाटतेय' असे ही म्हटले आहे. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे. या फोटोला अल्पावधीतच हजारो लाईक्स मिळाले आहेत.

हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचे लग्न २००० मध्ये झाले होते. लग्नाच्या १४ वर्षानंतर त्याच्या नात्यात दुरावा आल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. आता दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. हृतिक आणि सुजैन दोघेही आपल्या मुलासोबत टाईंम्स स्पेंड करताना अनेक वेळा दिसले आहेत. गेल्या काही दिवसांत हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादमुळे चर्चेत आला होता.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT