neha mahajan  
Latest

Neha Mahajan : मराठमोळ्या अभिनेत्रीचा ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये किलर लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक मराठी चित्रपटांसोबत साऊथ चित्रपटांमध्येही आपली अभिनयाची छाप सोडणारी नेहा महाजनने (Neha Mahajan) सर्वांचेचं लक्ष वेधून घेतले आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या फोटोजमुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिचा ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये किलर लूक सर्वांनाच मोहून टाकणारा आहे. (Neha Mahajan)

सूत्रांच्या माहितीनुसार, नेहा मालदिवला गेली आहे. सुट्टयांसाठी नव्हे तर ती एका प्रोजेक्टसाठी गेली आहे. तिने एका पाठोपाठ एक फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय.

एका फोटो नेहा रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. दुसऱ्या फोटोंमध्ये ती तिची मैत्रीण शुभांगीसोबत समुद्रकिनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसतेय. तिसऱ्या फोटोंमध्ये तिने स्कूबा डायव्हिंग करत तेथील जैवविविधता दाखवलीय. याचा एक व्हिडिओदेखील तिने इन्स्टाग्रामला शेअर केलाय.

आणखी काही फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसतेय. ती समुद्राच्या वाळूत ती झोपलेली दिसते. तिने या फोटोला Can we have a new birthday for everytime you feel reborn? अशी कॅप्शन लिहिलेली आहे.

नेहाने नीळकंठ मास्तर, कॉफी आणि बरचं काही, अजोबा, फ्रेंड्स या मराठी चित्रपटांतून उत्तम अभिनय साकारला आहे. युथ, मिड नाईट्स चिल्ड्रन हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

साऊथ चित्रपटामध्ये दिले होते बोल्ड सीन

नेहाने 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम चित्रपटासाठी न्यूड सीन्स दिल्याने प्रसिद्धीझोतात आली होती.'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम चित्रपटात तिने बोल्ड सीन्स दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT