bigg boss 16 
Latest

BB16 : अर्ध्या रात्री वॉशरूममध्ये सौंदर्या-गौतम लॉक, कधी किस तर…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस हाऊसच्या (BB16) घरामध्ये सौंदर्या-गौतमचा रोमान्स समोर येत आहे. एपिसोडमध्ये लेट नाईट गौतम-सौंदर्या रोमँटिक होताना दिसली. सौंदर्या गौतमला गालावर किस करते. गौतम-सौंदर्या अर्ध्या रात्री वॉशरूममध्ये लॉक होतात. ते ही एकदा नव्हे तर दोनदा. (BB16)

गौतम विग-सौंदर्या शर्मा

बिग बॉस 16 मध्ये प्रेमाचा बहर आलाय. लव्ह ट्रँगलदेखील बनताना दिसत आहेत. कधी शालीन-सुंबुल-टीना तर कधी शालीन-गौतम-सौंदर्या. घरात सध्या गौतम – सौंदर्याचा लव्ह अँगल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मागील एपिसोडमध्ये सौंदर्याने गौतमला किसदेखील केलं. गौतमने सौंदर्याच्या कंबरवर मलमदेखील लावलं.

अर्चनाने उघडलं रहस्य

अर्चनाने बिग बॉसला सांगितले की, गौतम रात्री सौंदर्याच्या कंबरवर बाम लावतो. अर्चनाने बिग बॉस आणि ऑडियन्सच्या समोर दोघांमधील नाते उघड करण्यात कुठलीही संधी सोडली नाही. तसं पाहिलं तर अर्चनाची झोपदेखील दोघांच्या रोमान्सने उडाली होती. त्यानंतर गौतम आणि सौंदर्याला वाशरूम जावं लागलं होतं.

वॉशरूममध्ये लॉक झाले गौतम-सौंदर्या

गौतम-सौंदर्याला अर्ध्या रात्री वॉशरूममध्ये लॉक होताना एक नाही तर दोन वेळा पाहण्यात आले. निर्मात्यांनी या गोष्टीवर अधिक फोकस नाही केलं आणि कॅमेरा हटवला. गौतम-सौंदर्याचं लपणं-छपणं ऑडियन्सचं नाही तर घरातीलही नोटिस करत आहेत. गौतम सुरुवातीपासून सौंदर्यासाठी आपलं प्रेम व्यक्त करत आहे. त्याला सौंदर्या आवडते. सुरुवातीला जेव्हा सौंदर्याने शालीनला किस केलं होतं. आणि नंतर शालीनने सौंदर्याला किस केलं, तेव्हा सर्वात अधिक परिणाम गौतमलाच झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT