बेळगाव : मांजाने घेतला बालकाचा बळी | पुढारी

बेळगाव : मांजाने घेतला बालकाचा बळी

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील न्यू गांधीनगर परिसरात रविवारी सायंकाळी पाच वर्षांच्या बालकाच्या गळ्याला पतंगाचा मांजा लागून निम्म्यापर्यंत गळा कापत गेल्याने तो मृत पावला. याच परिसरात रविवारी सकाळी एका तरुणाच्या गळ्याला मांजा लागून तो गंभीर जखमी झाला.वर्धमान इराण्णा बेली (वय 5, रा. हत्तरगी, ता. हुक्केरी) असे मृत बालकाचे नाव आहे. सकाळी घडलेल्या घटनेत जोतिबा निंगाणी हणमंताचे (वय 42, रा. हलगा) हे जखमी झाले आहेत.

इराण्णा तेली हे यंत्रमाग व्यावसायिक असून तयार केलेले कापड देण्यासाठी ते हत्तरगीहून वडगावला आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा वर्धमानदेखील आला होता. काम आटोपून ते परत निघाले असता राष्ट्रीय महामार्गावरील फळ मार्केटजवळ ही घटना घडली. या प्रकरणाची नोंद माळमारुती पोलिसांत झाली आहे.
जोतिबा हणमंताचे व त्यांची पत्नी दिवाळी खरेदीसाठी हलग्याहून बेळगावला येत होते. न्यू गांधीनगरजवळ जोतिबा यांच्या गळ्याला मांजा लागून ते जखमी झाले.

Back to top button