Big decision: King Khan to build stadium in US 
Latest

किंग खान शाहरुख थेट अमेरिकत बांधणार क्रिकेटचे मैदान

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड किंग खान आणि क्रिकेटप्रेमी शाहरूख खानने क्रिकेटवरील प्रेमाखातर वर्ल्ड क्लास क्रिकेट स्टेडिअम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे वर्ल्ड क्लास स्टेडिअम अमेरिकेत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि यूएसएचे मेजर लीग क्रिकेट हे संयुक्तरित्या या स्टेडिअमची उभारणी करणार असल्याची माहिती नाईट रायडर्सने त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे.

अमेरिकेतील लॉस एंजलिस या शहरात उभे राहणारे हे स्टेडिअम 15 एकरमध्ये उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमची बैठक क्षमता १ लाख इतकी असेल. हे स्टेडिअम जगातील सर्वाच मोठे आणि आकर्षक ठिकाण ठरेल, यात काही शंकाच नाही. ही आमची ही गुंतवणूक अमेरिकेतील नवोदित क्रिकेटसह सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे क्रिकेट जगतावर मोठा प्रभाव पडेल असे मत क्रिकेटप्रेमी किंग खान याने व्यक्त केले आहे. ही योजना आमच्यासाठी आणि एमएलसीसाठी खूपच आनंदाची असल्याचेही तो म्हणतो.

बॉलीवूडचा किंग खान हा नाईट रायडर्स संघाचा मालक असून, आत्तापर्यंतच्या आयपीएल हंगामात त्याच्या संघाने दोनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तो नेहमीच मैदानात हजर असतो, यावरूनच किंग खानचे क्रिकेटवरचे प्रेम दिसून येते.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT