Latest

Bhandara Rape Case : उच्च शिक्षित सासऱ्याचा सूनेवर बलात्कार, बेडरूममध्ये शिरून विकृत कृत्य

backup backup

उच्च शिक्षित सुनेवर सासऱ्यानेच बळजबरीने अत्याचार केल्याची घटना साकोली तालुक्यातील पळसगाव सोनका येथे उघडकीस आली. सुनेच्या तक्रारीवरून सासरा, पती आणि सासूवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. (Bhandara Rape Case)

यातील विवाहित तरुणी उच्चशिक्षित आहे. ३१ मे २०१९ रोजी तिचे लग्न सचिन सुखदेव वाढई याचेशी झाले. सचिन हा नागपूर येथे सीसीआरआय अनुसंधान केंद्र येथे टेक्निकल अधिकारी या पदावर कार्यरत आहे.

२५ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ३ च्या दरम्यान घरी एकटी असताना सासरा सुखदेव वाढई याने बेडरूममध्ये शिरून दरवाजा बंद केला. जबरदस्तीने सूनेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Bhandara Rape Case : पती आणि सासूकडून दुर्लक्ष

या प्रकाराची माहिती महिलेने पती आणि सासूला दिली. परंतु दोघांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. उलट ती मानसिक रुग्ण आहे असे गावात सांगून तिची बदनामी सुरू केली. तसेच मुलाने पत्नीला सोडून देण्यास सांगून तिच्यावर मानसिक दडपण आणले जात होते.

सदर घटना मागील वर्षी घडली असून तिच्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. तसेच नेहमी अश्लील शिवीगाळ करत होते. हा प्रकार असह्य झाल्याने तिने साकोली पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी पती सचिन, सासरा सुखदेव आणि सासू केसरबाई वाढई यांच्याविरुद्ध ३७६, ४९८ अ, ३०६, ५११, ५०९ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सासऱ्याला अटक करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक बोरकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT