एकरकमी चार हजार रुपये ऊस दरासाठी मिरज तालुक्यात शेतकरी संघटनेची पहिली ठिणगी | पुढारी

एकरकमी चार हजार रुपये ऊस दरासाठी मिरज तालुक्यात शेतकरी संघटनेची पहिली ठिणगी

मिरज; पुढारी वृत्तसेवा

मिरज तालुक्यात ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. उसाला टनाला एक रकमी चार हजार रुपये ऊस दर या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी बेडग वड्डी रस्त्यावरील खाडीलकर यांच्या शेतातील ऊस तोड बंद पाडली.

उसाला प्रति टन चार हजार रुपये दर द्यावा या मागणीसाठी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने मंगळवारी तालुक्यातील वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. उसाचा दर चार हजार रुपये जाहीर झाल्याशिवाय ऊसाची एक कांडीही कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. शेतकरी संघटनेचे महादेव कोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

हेही वाचलत का?

Back to top button