बेळगाव

कर्नाटक : बेळगावसह काही जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता

मोनिका क्षीरसागर

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
पुढील चोवीस तासांमध्ये बेळगावसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये तसेच मंगळूरचा आतील भाग, चिक्‍कमंगळूर, कोडगू, हासन, शिमोगा येथे पावसाची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हावेरी आणि गदगमध्ये जोरदार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये बंगळूर आणि परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे.

काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 34 डि. सें. आणि किमान तापमान 24 डि. सें. असणार आहे. मच्छीमारांसाठी पुढील 24 तासांकरिता कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. रविवारी रायचूरमध्ये सर्वाधिक 41 डि. सें. तापमान होते. तर दावणगिरीमध्ये सर्वात कमी 15 डि. सें. तापमानाची नोंद करण्यात आली.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT