बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची सोमवारी (दि. ११) बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
गेल्या महिन्यात मार्कंडेय कारखान्यासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव पॅनेलने दहा जागा जिंकत सत्ता मिळवली होती. आज सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत तानाजी पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आणि आर. आय. पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. दुपारी साडेबारा वाजता निवडणूक अधिकारी सहकार खात्याचे उपनिबंधक एम. एस. मणी आणि शंकर करगण्णावर यांनी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली.
यावेळी संचालक अविनाश पोतदार, जोतिबा आंबोळकर, सुनील अष्टेकर, बसवंत मायाण्णाचे, शिवाजी कुट्रे, सिद्धाप्पा टुमरी, बाबुराव पिंगट, चेतक कांबळे, लक्ष्मण नाईक, बाबासाहेब भेकणे, बसवराज गाणीगेर, वनिता अगसगेकर, वसुधा म्हाळोजी यांच्यासह समर्थक, माजी संचालक आणि विविध सोसायट्यांचे संचालक उपस्थित होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी शेतकर्यांच्या हितासाठी कारखाना काम करणार असून अधिकाधिक शेतकर्यांनी ऊस पुरवठा करावा, असे आवाहन केले.
हेही वाचा :