बेळगाव

Burglary incident : वेळ सकाळी 8 ते 9, चोरी आठ लाखांची

मोनिका क्षीरसागर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पाहुण्यांना सोडण्यासाठी सकाळी 8 वा. बाहेर पडले व 9 वाजता घरी आले. या अवघ्या तासाभरात दोन चोरट्यांनी तब्बल 8 लाखांची घरफोडी (Burglary incident) केली. 15 तोळे सोन्याचे दागिने व 53 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. शहापूरमधील हुलबत्ते कॉलनी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. व्यावसायिक सुनील विजापुरे यांच्या बंगल्यात हा प्रकार घडला.

सुनील विजापुरे हे पत्नी व मुलासह राहतात. घरी पाहुणे आले होते. ते महाराष्ट्रात जाणार असल्याने आरटीपीसीआरची अडचण भासणार म्हणून त्यांनी पाहुण्यांना सोडण्यासाठी कारने स्वतः कोगनोळी नाक्यापर्यंत जाण्याचे ठरवले. सोबत पत्नी व मुलाला देखील घेतले. सकाळी 8 वा. ते घरातून बाहेर पडले.                                                                                                                                                विजापुरे संकेश्‍वरपर्यंत पोहोचले असतील तितक्यात त्यांच्या शेजार्‍याने त्यांना फोन केला व तुमच्या घरासमोर दोघे तरुण बसले आहेत, (Burglary incident) असे सांगितले. विजापुरे यांनी बाजूलाच असलेल्या नातेवाईकांना फोन करून घरासमोर कोण बसले आहे? हे पाहण्यास सांगितले.

चोरी करून पोबारा
विजापुरे यांचे नातेवाईक जेव्हा घरात पोहोचले तेव्हा समोरील दरवाजाचे इंटरलॉक तोडले होते, शिवाय पाठीमागील दरवाजा देखील रिकामा होता. तिजोरीचे लॉक देखील तोडल्याचे दिसून येत होते. त्यांनी विजापुरे यांना फोन करून घडला प्रकार सांगितला. हे ऐकताच धक्का बसलेले सुनील विजापुरे तेथूनच माघारी वळले. नऊच्या आतच ते घरात पोहोचले. त्यांनी येऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. दागिने व रोकड चोरीला (Burglary incident) गेल्याचे पाहून त्यांनी ही माहिती शहापूर पोलिसांना दिली.

श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी
शहापूरचे पोलिस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. ठसेतज्ज्ञांना दारावर व आतील कपाटावरील ठसे मिळाले आहेत. श्‍वानपथकाकडून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, श्‍वान परिसरातच घुटमळले.

चोरीनंतर चोरटे पायरीवर
मिळालेल्या माहितीनुसार विजापुरे कुटुंब घरातून बाहेर पडताच अवघ्या काही दहा मिनिटांतच चोरट्यांनी घरात प्रवेश केला असावा. घरातील चोरी (Burglary incident) आटोपून चोरटे घरासमोरच पायरीवर बसल्याचे एकाने सांगितले. त्यानंतर ते तेथून निघून गेले आहेत. हे दोघेही 20 ते 25 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचलत का ?    

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT