बेळगाव: पावसाने महिनाभर दडी मारल्याने पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या पिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच यंदा पावसाने सुरुवातीला महिनाभर दडी मारली. यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये महिना झाला, तरी अद्याप पाऊस झालेला नाही.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. पाऊस कधी गतिमान होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सर्वच पावसाळी पिके धोक्याच्या स्थितीत आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकल्या आहेत. बेळगाव तालुक्यातील भात, नाचणी, रताळी, भुईमूग या पिकांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा