बेळगाव : कपिलेश्वर तलावात वृद्ध महिला, पुरुषाचा मृतदेह आढळला | पुढारी

बेळगाव : कपिलेश्वर तलावात वृद्ध महिला, पुरुषाचा मृतदेह आढळला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तलावात वृद्ध महिला व एका वृद्ध पुरुषाने जीवन संपवल्‍याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली. यापैकी पुरुषाची ओळख पटली असून, सदर वृद्धेची ओळख पटविणे सुरू आहे.

कपिलेश्वर तलावाच्या पाठीमागील जुन्या तलावात आज सकाळी दोन मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती खडेबाजार पोलिसांना मिळताच निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटविण्याचे काम सकाळपासून सुरू होते. यापैकी वृद्ध पुरुषाची ओळख पटली आहे.

विजय पवार (वय 60, रा. कांगले गल्ली) असे मृताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. याच मानसिक अस्वस्थतेतून त्यांनी जीवन संपवल्‍याचा संशय आहे. मृत वृद्ध महिला कोण हे अद्याप समजले नसून, खडेबाजार पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button