बेळगाव

बेळगाव : बस सेवा विस्कळीत; लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक बस फेऱ्यांमध्ये घट

मोहन कारंडे

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सुमारे एक हजार बस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याची देखील बस सेवा विस्कळीत झाली आहे. बेळगाव आगारामध्ये लांब पल्ल्याच्या बससह ग्रामीण भाग व स्थानिक बस सेवा देखील विस्कळीत झाल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे.

बस येणार आहे का? याची चौकशी करण्यासाठी परिवहन मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधला असता निकालापर्यंत बस सेवा विस्कळीत होणार असून मिळेल त्या बसने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला जात आहे. बेळगाव जिल्ह्यात ४२ बस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येत आहेत. त्याशिवाय निवडणूक कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना पहाटेपासून मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी देखील शंभरहून अधिक बस तैनात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्यांत घट केली आहे. लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या असून मोजक्याच बस प्रवाशांना घेऊन धावत असल्याचे चित्र बेळगाव आगारात पहावयास मिळत आहे. उपनगरात व आजूबाजूच्या गावामध्ये धावणाऱ्या बस देखील कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत ताटकळत आगारात उभे राहावे लागत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT