कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज विशेष रेल्वे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. मतदनाची टक्केवारी वाढावी यासाठी रेल्वे खात्याने विशेष रेल्वे आणि जादा डब्यांची सोय केली आहे.
बंगळूरपासून निघणारी रेल्वे धारवाड, बेळगावमार्गे धावणार आहे. बेळगावमधून 10 मे रोजी सकाळी 5.30 वा. निघणारी रेल्वे 11 रोजी सकाळी 65 वा. विश्वेश्वराय्या रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. यशवंतपूर पासून मुर्डेश्वरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. त्याचबरोबर बागलकोट, म्हैसूरसाठी बसव एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. बंगळूर, रायचूर यादगीरीसाठी जादा रेल्वे डब्यांची सोय करण्यात आली आहे. बंगळूर ते हुबळीसाठी जणशताब्दी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे.