

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीमध्ये मतदान हे पवित्र कर्तव्य म्हणून ओळखले जाते. एका मताने लोकप्रतिनिधींची निवड होते. परिणामी प्रत्येक मत अमूल्य असते. याची जाणीव ठेऊन मतदान प्रक्रियेत प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, ही उदाशीनवृत्ती सोडून मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा.